Siddheshwar Munde

Siddheshwar Munde संघटन हि शक्ती है !

18/08/2026

ग्रामपंचायत शिवरे ता.पारोळा जि.जळगाव येथील ग्रामसेवक/ग्रामपंचायत अधिकारी पी.एन.पाटील सर यांचा ग्रामसभेत गावगुंडांनी केलेल्या राड्यामुळे ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे,त्यांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून भावपुर्ण श्रद्धांजली!
या निर्दयी व दुर्दैवी घटनेचा महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटने कडून जाहीर निषेध करण्यात येत असून ग्रामसेवक पी.एन.पाटील साहेबांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रत्येक गावगुंडावर शासनाने कठोर कारवाई करावी,या घटनेसाठी ज्या ज्या ठिकाणी ग्रामसेवक संघटना आंदोलन करील त्या प्रत्येक ठिकाणच्या आंदोलनात त्या ठिकाणच्या संगणकपरिचालकांनी सहभागी व्हाव,महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने या घटनेसाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा देण्यात येत आहे.
#संगणकपरिचालक
सिद्धेश्वर मुंडे मुकेश नामेवार मयुर कांबळे
अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव
महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना

03/08/2026

सर्वांना माहितीस्तव(03 ऑगस्ट 2026)---
राज्यातील ग्रामपंचायत संगणकपरिचालकांचे मे व जून 2026 या दोन महिन्यांचे मानधन देण्याची मागणी आपण ग्रामविकास विभाग व Rgsa कडे केली होती,त्यावर त्यांनी सांगितले मे 2026 या एका महिन्यांचे मानधन होईल जून 2026 चे मानधन करण्या एवढा निधी नाही,निधी जमा होताच जून 2026 चे मानधन होईल,त्यानुसार आज मे 2026 चे मानधन जमा होत आहे.
जुलै 2026 च्या उपस्थिती पटाची मागणी Rgsa कडून करण्यात आली आहे,त्यानुसार जिल्हा व तालुका कमिटी यांनी आपल्या जिल्ह्याचे उपस्थिती पट Zp वरून Rgsa ला लवकर पाठवन्याचे नियोजन करावे.
#संगणकपरिचालक
सिद्धेश्वर मुंडे मुकेश नामेवार मयुर कांबळे
अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव
महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना

आज आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र विठ्ठल टेकडी देवस्थान नंदागौळ येथे भगवान श्री विठ्ठल - रुक्मिणी व महानसंत जगमित्रना...
25/07/2026

आज आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र विठ्ठल टेकडी देवस्थान नंदागौळ येथे भगवान श्री विठ्ठल - रुक्मिणी व महानसंत जगमित्रनागा महाराजांचे दर्शन घेतले!
आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकभक्तांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
जय_हरी_विठ्ठल 💐💐💐💐
🙏🙏🚩🚩

20/07/2026

देशात आंदोलन कोणीही करू द्या,शासनासमोर मांडण्यात आलेल्या मागण्या शासनाने समजून घेऊन त्यावर निर्णय दिला पाहिजे,आंदोलनावर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढणे अंत्यत चुकीचे आहे,दिल्लीत सध्या सुरू असलेले आंदोलन तर विद्यार्थी करत आहेत आणि विद्यार्थी आंदोलन का करत आहेत,शैक्षणिक व्यवस्था भ्रष्ट झाली आहे,नीट सह अन्य अनेक विभागात व नौकर भरतीत सुद्धा पेपरफुटी झाल्याने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर मोठा अन्याय होत आहे.
यासाठी केंद्र सरकारने मोठे मन करून झालेली चूक मान्य केली पाहिजे व यापुढे कठोर कायदे व नियम करून अशी चूक पुन्हा होणार नसल्याचे ठोस आश्वासन आंदोलन स्थळावर जाऊन दिले पाहीजे!
इथे विद्यार्थी व तरुणांवर लाठीचार्ज करून आंदोलन मोडीत काढण्यात काहीही अर्थ नाही हे शासनाने समजून घेतले पाहिजे,आपल्या देशात लोकशाही आहे याचे भान सरकारने ठेवले पाहिजे!
#दिल्ली_आंदोलन

संगणकपरिचालकांना देण्यात आलेल्या SIR च्या कामाबाबत(17 जुलै 2026)----    एकीकडे शासन म्हणते संगणकपरिचालक कर्मचारी नाहीत आ...
17/07/2026

संगणकपरिचालकांना देण्यात आलेल्या SIR च्या कामाबाबत(17 जुलै 2026)----
एकीकडे शासन म्हणते संगणकपरिचालक कर्मचारी नाहीत आणि दुसरीकडे प्रशासनातील अधिकारी शासकीय कर्मचारी समजून निवडणूक किंवा अन्य विभागाचे काम लावत आहेत त्यात सध्याचे SIR चे काम कर्मचारी नसताना संगणकपरिचालकांना जबरदस्तीने दिले जात आहे,आता पर्यंत प्रकल्पाच्या कामा व्यतिरिक्त निवडणूक विभागासह अनेक विभागाचे काम संगणकपरिचालकांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे ऐकून केलेले आहे,प्रशासनाला नेहमी संगणकपरिचालकांनी सहकार्य केले आहे,कोणतेही काम असुद्या केलेले आहे,केव्हाच आडमुठी भूमिका घेतली नाही,मग SIR सारख्या महत्वाच्या कामात सुद्धा संगणकपरिचालकांनी सहकार्य केले असते,परंतु ग्रामविकासमंत्री मा.ना.जयकुमारजी गोरे साहेबांनी सांगितले की,संगणकपरिचालक हे कर्मचारी नाहीत उद्योजक आहेत,त्यांना किमान वेतन किंवा कर्मचारी दर्जा सुद्धा शासन देऊ शकत नाही,त्यामुळे महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेने निर्णय घेतला आहे की SIR चे काम करायचे नाही,म्हणून शासनाला व निवडणूक आयोगाला निवेदन दिलेले आहे,तरीही संगणकपरिचालकांना हे काम करण्यासाठी दबाव देण्यात येत आहे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र दिले आहेत.
या सर्व मुद्यावर ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा झाली असून कालच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव साहेबांनी msg करून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मा.मुख्यकार्यकारी अधिकारी साहेबांना सूचना केली आहे की संगणकपरिचालक हे कर्मचारी नाहीत त्यांना निवडणुकीचे काम देऊ नये आणि याबाबत संबंधित जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी यांना कल्पना द्यावी असे सांगितले आहे.
तरी SIR चे काम करण्यासाठी प्रशासनाकडून कितीही दबाव आला कितीही नोटीस दिल्या आणि गुन्हा जरी दाखल झाला तरी कोणीही काम करायचे नाही.
#संगणकपरिचालक
सिद्धेश्वर मुंडे मुकेश नामेवार मयुर कांबळे
अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव
महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना

ग्रामपंचायत संगणकपरिचालक कर्मचारी नसताना नियमबाह्य व बेकायदेशीर पद्धतीने SIR चे काम करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर क...
13/07/2026

ग्रामपंचायत संगणकपरिचालक कर्मचारी नसताना नियमबाह्य व बेकायदेशीर पद्धतीने SIR चे काम करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा!

महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेने राज्य निवडणूक आयोगाला दिले निवेदन!

राज्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतच्या संगणकपरिचालकांना संगणकपरिचालक हे कोणत्याही प्रकारचे कर्मचारी नसताना नियमबाह्य व बेकायदेशीर पद्धतीने संगणकपरिचालकांना निवडणूक विभागाचे स्थानिक अधिकारी अनधिकृत आदेश काढून SIR चे काम करण्याची शक्ती करत आहेत,त्यामुळे महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन देऊन संगणकपरिचालक हे कर्मचारी आहेत हे स्पष्ट करावे आणि संगणकपरिचालक कर्मचारी नसतील तर नियमबाह्य व बेकायदेशीर आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे,सदरील निवेदन राज्य संघटनेच्या वतीने पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष मा.धनेशजी भोईर यांनी आज 13 जुलै 2026 रोजी राज्य निवडणूक आयोग मुंबई व सर्व संबंधिताना दिले आहे.
राज्यातील कोणत्याही संगणकपरिचालकांनी स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांचा दबाव घेऊन SIR चे किंवा आपले सरकार प्रकल्पा व्यतिरिक्त कोणतेही काम करायचे नाही,निवडणूक आयोगाकडे आपणच त्यांची तक्रार केली आहे,कर्मचारी नसताना त्यांना हे काम लावता येत नाही,फक्त काम करून घेण्यापुरता आपला वापर केला जात आहे.
आपण फक्त किमान वेतन व कर्मचारी दर्जा मागतो त्यावेळी स्वतः ग्रामविकासमंत्री साहेब व ग्रामविकास विभाग म्हणतो तुम्ही कर्मचारी नाही उद्योजक आहेत आणि असे काम करायचे म्हणले की आपण कर्मचारी हे धोरण जमणार नाही,इथून मागे अनेक वेळा प्रत्येक वेळी संगणकपरिचालकानी काम केले आहे पण आता असले कोणतेच काम करायचे नाही कारण की आपण कितीही काम केले तरी शासनाला त्याचा काहीही फरक पडत नाही.
शासनाने कर्मचारी दर्जा व फक्त किमान वेतन द्यावे मगच प्रकल्पा व्यतिरिक्त कामे केली जातील अन्यथा पत्र,नोटीस किंवा कोणत्याही आदेशाला आपण जुमाणणार नाही,त्यामुळे सर्व संगणकपरिचालकांनी एकजुटीने हे काम करू नये.
#संगणकपरिचालक
सिद्धेश्वर मुंडे मुकेश नामेवार मयुर कांबळे
अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव
महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना

ग्रामविकासमंत्री मा.ना.जयकुमारजी गोरे साहेब आपण विधानसभा व विधानपरिषदेत संगणकपरिचालकांना 10 हजार रुपये मानधना व्यतिरिक्त...
10/07/2026

ग्रामविकासमंत्री मा.ना.जयकुमारजी गोरे साहेब आपण विधानसभा व विधानपरिषदेत संगणकपरिचालकांना 10 हजार रुपये मानधना व्यतिरिक्त 50 ते 60 हजार रुपये कमिशन मिळते असे सांगितले होते,पण तुम्ही मंत्री असलेल्या ग्रामविकास विभागातील प्रत्येक जिल्हा परिषद म्हणते संगणकपरिचालकांना शून्य(निरंक) कमिशन मिळते,त्यातील एक रायगड जिल्हा परिषदेने दिलेल्या अहवालाची प्रत आपल्याकडे देण्यात येत आहे.
मग मा.गोरे साहेब आपण एक जबाबदार मंत्री असताना असे चुकीचे उत्तर का दिले ? याचे उत्तर द्या !
सोबत - रायगड जिल्हा परिषदेने Rgsa ला दिलेला अहवाल
Devendra Fadnavis
Jaykumar Gore
#संगणकपरिचालक

10/07/2026

माजीमंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार मा.बच्चूभाऊ कडू साहेब यांनी विधानपरिषदेत ग्रामविकासमंत्री यांनी ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना 10 हजार रुपये मानधना व्यतिरिक्त 50 ते 60 हजार रुपये कमिशन मिळते असे खोटे व चुकीचे उत्तर दिले,त्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला,विधानपरिषदेत सत्य समोर आले पाहिजे!
हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्याबद्दल मा.बच्चूभाऊ कडू साहेब यांचे महाराष्ट्रातील सर्व संगणकपरिचालक,महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून मनःपूर्वक धन्यवाद व आभार!
Devendra Fadnavis
Jaykumar Gore
Bacchu Kadu
#संगणकपरिचालक
💐💐💐💐💐

09/07/2026

शासनाचे कर्मचारी नसताना बेकायदेशीररित्या संगणकपरिचालकांना SIR चे काम करण्याची सक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
#संगणकपरिचालक

वाशिम जिल्ह्यातील कारंजाचे उपविभागीय अधिकारी म्हणतात ग्रामपंचायत संगणकपरिचालक हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी आहेत...
09/07/2026

वाशिम जिल्ह्यातील कारंजाचे उपविभागीय अधिकारी म्हणतात ग्रामपंचायत संगणकपरिचालक हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी आहेत आणि ग्रामविकासमंत्री मा.ना.जयकुमारजी गोरे साहेब म्हणतात संगणकपरिचालक हे कर्मचारी नाहीत उद्योजक आहेत ?
त्यामुळे खाली कोणते काम करून घ्यायचे असेल तर संगणकपरिचालक हे शासकीय कर्मचारी आहेत आणि शासन स्तरावर फक्त किमान वेतन द्यायचे म्हणल्यावर संगणकपरिचालक हे उद्योजक आहेत त्यांना किमान वेतन देता येत नाही म्हणायचे असे कसे चालेल साहेब!
उपविभागीय अधिकारी साहेब संगणकपरिचालकांवर दबाव टाकून तुम्हाला काम करून घेता येणार नाही,त्यासाठी प्रधान सचिव व उपसचिव साहेबांनी दिलेले पत्राचे वाचन करा आणि मग काम करण्याची सक्ती करा!
जर खरच शासनाने संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन दिले असते तर संगणकपरिचालकांनी आता पर्यंत विना मोबदला निवडणूक विभागाचे काम केले तसे आता सुद्धा केले असते.
Devendra Fadnavis
Jaykumar Gore
#संगणकपरिचालक

Address

Parli Vaijnath
431515

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddheshwar Munde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Siddheshwar Munde:

Shortcuts

Share