07/09/2020
सकाळी नाश्त्यामध्ये पोहे खाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे:
पोहे हा असा एक पदार्थ आहे, जो भारतात आवडीने खाल्ला जातो.पोहे हा एक भारतीय पदार्थ आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहाड्रेटस आणि २३.१ टक्के प्रोटीन असते. वजन कमी करण्यासाठी पोहे फायदेशीर मानले जातात.
1.शरीराला मिळते भरपूर ऊर्जा:- नाश्त्यामध्ये कांदे पोहे खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. थोड्या थोड्या प्रमाणात पोहे खाल्ल्यास आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते.
2. चविष्ट आणि पोषण तत्त्व:- कांदे पोह्यांच्या रेसिपीमध्ये आपण कित्येक प्रकारच्या भाज्या, शेंगदाणे आणि सुकामेव्याचाही वापर करतो. उदाहरणार्थ काजू, मनुके इत्यादी. या सामग्रीमुळे कांदे पोहे चविष्ट होतात.
3. शरीराचा आकार:- या डिशमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरी असतात. कांदे पोहे खाऊन तुम्ही दिवसाची सुरुवात केल्यास तुमचे वजन वाढणार नाही. सोबत तुमच्या आरोग्याला आवश्यक असणाऱ्या पोषण तत्त्वांचा पुरवठा देखील होतो.
4.पोट स्वच्छ राहते:- पचन प्रक्रियेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी पोहे महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. कारण पोहे हा फायबरयुक्त एक हलका पदार्थ आहे. पोह्यांची पचन प्रक्रिया हळूहळू होते. यामुळे शरीरामध्ये दीर्घकाळापर्यंत ऊर्जा टिकून राहते.
5.शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते:- पोह्यांमध्ये लोह भरपूर प्रमाणात आहे. याच कारणामुळे शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात लोहाचा पुरवठा होतो, तेव्हा रक्त प्रवाहाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी देखील वाढते आणि शरीर सक्रिय राहण्यास मदत मिळते.
हा लेख आपणास आवडला असेल तर आजच आमच्याकडे उपलब्ध असलेले सफेद साधे पोहे व लाल गावठी पोहे यांची मागणी नोंदवा.
असेच प्रोडक्ट घरबसल्या मिळवण्यासाठी व सदृढ आरोग्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.
Mobile: 9892436870