25/05/2021
नमस्कार मंडळी,
आज एक व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यात तुम्ही पाहू शकता की एक दुकान सुरू आहे, जिथे काही लोक आपल्या गरजेचे सामान घेत आहेत. घेऊद्यात, पण ज्या दुकानातून घेत आहेत, मला त्या दुकानाबाबत बोलायचे आहे.
दुकानाचे नाव : बामनदेव डेरी.
आता डेरी बोललो तर प्रत्येक जण समजून जातो की इथे दूध मिळतं आणि दुधापासून बनवलेले पदार्थ.
सध्याच्या लोकडाऊन च्या ह्या कठीण वेळेस बहुतेक व्यापार बंद पडले, तर कित्येकांनी भाजी, वगैरे विकायला सुरू केली ज्यांनी त्यांचा व त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह व्हावा ह्यासाठी. 👌 उत्तम निवड शेवटी दारू, गुटका ना विकता काही तरी चांगली वस्तू विकण्याचा निर्णय त्या उद्योजकाने घेतला. 👍
पण इथे असं नाही, ह्या डेरी मध्ये, तंबाखू, गुटखा, आणि मिनी जनरल स्टोर बनवले आहे. आणि त्यात इतकी उर्मट भाषा की काय बोलावे. सर्रास लोकडाऊन चे नियम धाब्यावर हाणून रोज रात्री पर्यंत हे दुकान सुरू असते. का ह्या एक दुकानाला मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांनी मुभा मोकळीक दिली आहे का. का बाकीच्या दुकानदारांची मुलं बाळं नाहीत का? संसार नाही का?
मुळात डेरी म्हटले की स्वस्त दूध मिळाले पाहिजे, तर ह्या दुकानात बाकीच्यांपेक्षा महाग, कारण की त्याला कोणी दूध पुरवत नाही. मं माझा हा प्रश्न आहे की जर दूध मिळत नाही तर सरळ जनरल स्टोर उघड, आणि कर उद्योग. पण डेरी च्या नावाखाली, भाजी, गुटखा, तंबाखू इत्यादी वस्तू विकून तू गिऱ्हाकांच्या स्वास्थ्याशी खेळत आहे. डेरी अली की सगळ्यात जास्त निघा ठेवली आणि घेतली जाते.आणि डेरी म्हणजे फक्त डेरी आणि त्याशी निगडीत वस्तू विकल्या जाऊ शकतात.
कृपया ह्याची दखल घ्यावी आणि योग्य असा निर्णय घ्यावा अशी विनंती.
आपला,
अमित अशोक निकम