FarmPrecise

FarmPrecise An interactive mobile application which generates dynamic, weather-based, crop advisories..

05/09/2026

कपाशीतील आकस्मिक मर रोग :
लक्षणेः दिवसाचे तापमान ३८० सें. पेक्षा जास्त दीर्घकाळ टिकून राहिल्यास तसेच पाण्याचा ताण बसल्यास आणि पावसाळ्यामध्ये शेतात पाणी साचून राहिल्यास कपाशीच्या शरीरक्रियांवर अनिष्ट परिणाम होतो. पाण्याचा ताण बसल्यामुळे अन्नद्रव्य शोषून घेणाऱ्या जलवाहिन्या फुगीर बनतात आणि नलिका बंद होतात. झाडाच्या पाने, फुले व बोंडे यांना अन्नद्रव्य पुरवठा न झाल्यामुळे पानांचा तजेला नाहीसा होतो आणि पाने पिवळी पडतात. पाने, फुले व बोंडे यांची गळ होते आणि झाड मरते.
उपायः पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि साचलेले पाणी लगेच काढून द्यावे. विकृतीग्रस्त झाडांना लक्षणे दिसू लागताच १.५ किलो युरिया १.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश १०० लिटर पाण्यात मिसळून १५० ते २०० मि.लि. द्यावे. त्यानंतर ८-१० दिवसांनी २ किलो डिएपी १०० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण १५० ते २०० मि.लि. झाडाच्या बुंध्याजवळ ओतावे व लगेच पाणी द्यावे.
#कपाशी #शेतकरी #कृषी #शेती

29/08/2026

लाल्या रोग व्यवस्थापन
लक्षणेः कपाशीची पाने लाल होण्याचे मुख्य कारण नत्राची कमतरता होय, नत्र खतांच्या कमतरतेमुळे बोंड वाढीच्या अवस्थेमध्ये पानातील हरित द्रव्यामधील नत्र वापरले जाते आणि पाने लाल होतात.
याबरोबरच मॅग्रेशियम ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आणि रस शोषणाऱ्या किडींच्या (मुख्यत्वे तुडतुडे) प्रादुर्भावामुळे सुध्दा कपाशीची पाने लाल होतात.
उपायः (१) लाल्या प्रतिकारक वाणांची निवड करावी. (२) शिफारसीत खतांच्या मात्रा द्याव्यात. बीटी वाणासाठी शिफारशी मात्रेपेक्षा २५ टक्के खत जास्त द्यावीत. त्यामध्ये २० टक्के नत्र लागवडीच्या वेळी, ४० टक्के नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी आणि ४० टक्के नत्र लागवडीच्या ६० दिवसांनी द्यावे. मॅग्नेशियमसारखे सूक्ष्म अन्नद्रव्य (२० ते ३० किलो/हे.) जमिनीत द्यावे. वाढीच्या काळात २ टक्के डिएपी खतांच्या दोन फवारणी १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. रस शोषक किडीचे वेळोवेळी नियंत्रण करावे.
#शेतकरी #कृषी

19/08/2026

गावरान बियाण्यांची जपणूक, महिलांच्या हातून.

संध्या स्वयंसहायता बचत गटातील महिला पारंपरिक गावरान बियाण्यांचे संवर्धन करण्यासाठी Seed Bank चालवत आहेत.

मठ, मूग, हुलगे, तूर, चवळी, बाजरी, हरभरा, वटाणा, उडीद, ज्वारी अशा विविध गावरान बियाण्यांचा या Seed Bank मध्ये संग्रह आहे.
पारंपरिक बियाण्यांचे जतन करून शेतीतील जैवविविधता टिकवणे आणि पुढच्या पिढीपर्यंत ही समृद्ध परंपरा पोहोचवणे, हा या महिलांचा प्रयत्न आहे.

जाणून घ्या गावरान बियाण्यांच्या या अनोख्या Seed Bank ची गोष्ट.

#गावरानबियाणे #ᴡᴏᴍᴇɴᴇᴍᴘᴏᴡᴇʀᴍᴇɴᴛ

18/08/2026

तुम्ही शेतात हे पिवळ्या रंगाचे Card लटकलेले पाहिले आहे का? हे फक्त एक साधं कार्ड नाही, तर शेतकऱ्यांचा protective friend sarkha आहे. याला चिकट सापळा किंवा स्टिकी ट्रॅप म्हणतात.
शेतात अनेक हानिकारक किडी पिकांचे नुकसान करतात. या किडींना पिवळा रंग खूप attract करतो. त्यामुळे त्या या चिकट सापळ्याकडे उडत येतात आणि त्यावरील चिकट पदार्थाला चिकटून बसतात.
आता तुम्ही विचाराल, याचा फायदा काय? जेव्हा या sticky trap var जास्त किडी दिसायला लागतात, तेव्हा शेतकऱ्यांना लगेच समजते की शेतात किडींचा presence वाढत आहे. त्यामुळे ते योग्य वेळी योग्य उपाययोजना करू शकतात.
यामुळे अनावश्यक pesticides chi फवारणी टाळता येते, खर्च कमी होतो, environent che नुकसान कमी होते आणि पिकांचे संरक्षणही चांगल्या प्रकारे होते.
म्हणूनच, दिसायला साधा असलेला हा पिवळा sticky trap शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तो किडींवर लक्ष ठेवतो, वेळेवर इशारा देतो आणि शेती अधिक सुरक्षित आणि शाश्वत बनवण्यास मदत करतो.

06/08/2026

तांबेरा हा एक बुरशीजन्य रोगआहे. या रोगामुळे पिकाचे ४० ते ८०% नुकसान होते. सरूवातीला जमिनीलगतच्या पानाच्या खालील बाजूस तपकिरी रंगाचे पुरळ दिसून येतात. नंतर हे पुरळ पक्व होऊन त्यातून भुरकट तपकिरी रंगाची भुकटी म्हणजेच रोगाचे बिजाणु बाहेर पडतात आणि वाऱ्यामार्फत पसरतात. हवेत असणारी ७०% पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता, रिमझीम पडणारा पाऊस, किमान ६ तास पाने ओलसर राहणे, दिवसाचे तापमान १८ ते २८° से. या बाबी रोगवाढीस अत्यंत अनुकूल आहेत. अशा वातावरणात रोगाचा प्रादुर्भाव जुन्या पानांसोबत कोवळ्या पानांवर, देठांवर, शेंगांवर आणि खोडावरही दिसून येतो. साधारणतः १० ते १२ दिवसात पाने पिवळी पडून अकाली पानगळ होते. दाण्यांच्या वजनात लक्षणीय घट येते व उत्पादन घटते. रोगनियंत्रणासाठी तांबेरा प्रभावीत भागात पेरणी शक्यतो १५ ते २५ जूनच्या दरम्यान करावी. रोगाची लक्षणे दिसताच हेक्झाकोनॅझोल ५% ईसी १० मिली अथवा प्रोपीकोनॅझोल २५% ईसी १० मिली अथवा क्रिसॉक्झिम मिथाईल ४४.३% ईसी १० मिली प्रती १० लि. पाण्यात मिसळून पिकाच्या अवस्थेनुसार १५ दिवसांच्या अंतराने १ ते २ फवारण्या घ्याव्यात.
अशा उपयुक्त माहितीसाठी आजच फार्मप्रिसाईज app डाउनलोड करा."फार्म प्रिसाईज अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा"
https://wotr.page.link/eMBaCbRLhpd6CYan7

31/07/2026

सोयाबीनची पानं पिवळी पडतायत? उत्पादन निम्म्यावर येण्याआधी हे नक्की जाणून घ्या.
"सोयाबीनमध्ये दिसणारा पिवळा मोझॅक हा एक विषाणूजन्य रोग आहे.हा रोग मुंगबीन यलो मोझेंक व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होऊन याचा प्रसार पांढरी माशी या किड़ीद्वारे होतो. सोयाबीनची बिगर हंगामी लागवड वाढल्याने या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढीच्या सर्व अवस्थामध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. पानांवर गर्द पिवळे ठिपके, चट्टे पडून पाने पिवळी होतात. त्यामुळे कर्बग्रहण क्रिया मंदावते व शेंगा व्यवस्थीत भरत नाहीत. फूलोऱ्यापुर्वी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फुले कमी लागतात व उत्पादनात मोठी घट येते. नियंत्रणासाठी रोगप्रतिकारक /रोगसहनशील जातींची (जे एस २०-२९, जे एस ९७- ५२, जे एस २०-६९, जे एस ९५-६०) लागवड़ करावी. रोगग्रस्त झाड़े तात्काळ उपटून त्याचा नायनाट करावा. हेक्टरी १५-२० पिवळे चिकट सापळे पिकात सुरुवातीपासून लावावेत. शेत व बांध तणमुक्त ठेवावेत. पांढऱ्या माशीचे वेळोवेळी नियंत्रण करावे.
#शेतकरी #सोयाबीन #कृषीमाहिती
अशा उपयुक्त माहितीसाठी आजच फार्मप्रिसाईज app डाउनलोड करा."फार्म प्रिसाईज अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा"
https://wotr.page.link/eMBaCbRLhpd6CYan7

27/07/2026

सापळा पीक लागवडीचे फायदे.
मुख्य पिकाचे किडीपासून संरक्षणः हानिकारक कीटक मुख्य पिकाऐवजी सापळा पिकाकडे आकर्षित होतात, ज्यामुळे मुख्य पिकाचे नुकसान टळते.
किटकनाशकांच्या खर्चात बचतः संपूर्ण शेतावर फवारणी न करता केवळ सापळा पिकावर नियंत्रण ठेवावे लागते. यामुळे रासायनिक किटकनाशकांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचतो.
मित्र किर्डीचे संवर्धनः सापळा पिकांवर हानिकारक कीटक जमा झाल्यामुळे त्यांना खाणारे लेडी बर्ड बीटल, क्रायसोपर्ला यांसारखे मित्र कीटक तिथे नैसर्गिकरित्या वाढतात.
कीड नियंत्रण सोपेः शत्रू कीटक एकाच ठिकाणी (सापळा पिकावर) जमा झाल्यामुळे त्यांचे अंडीपुंज किंवा अळ्या हाताने वेचून नष्ट करणे सोपे जाते.
पर्यावरणाचे रक्षणः रासायनिक फवारण्या कमी झाल्यामुळे जमीन, पाणी आणि हवा प्रदूषित होत नाही आणि अन्नातील विषारी अंश कमी होतात.
अतिरिक्त उत्पन्नः काही सापळा पिकांपासून (उदा. झेंडू, चवळी, एरंडी) मुख्य पिकाव्यतिरिक्त अतिरिक्त आर्थिक उत्पन्न किंवा चारा मिळतो.
#सापळापीक #कीडव्यवस्थापन #शाश्वतशेती #कृषी #शेतकरी
अशा उपयुक्त माहितीसाठी आजच फार्मप्रिसाईज app डाउनलोड करा."फार्म प्रिसाईज अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा"
https://wotr.page.link/eMBaCbRLhpd6CYan7

14/07/2026

मागील ३-४ वर्षांत हुमणीचा प्रादुर्भाव फक्त ऊसापुरता मर्यादित राहिलेला नाही.
आता कापूस, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला आणि अनेक खरीप-रब्बी पिकांमध्येही ही कीड मोठ्या प्रमाणात दिसून येते.

हुमणीचं आयुष्य साधारण एक वर्षाचं असतं.
किडीची अळी अवस्था सुरुवातीला कोवळी मूळ खाऊन उपजीविका करते
मुख्य मूळ कुरतडल्यामुळे पीक वाळतं आणि कधी कधी दुबार पेरणीची वेळही येते."
"सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे...हुमणी अळीचे भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनीबाहेर असते. बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात. जमिनीत असणाऱ्या अवस्था नियंत्रण करणे कठीण जाते किंवा निवडलेल्या उपाययोजना त्यापर्यंत पोहचत नाही त्यामुळे अपेक्षित असे परिणाम या किडीवर मिळत नाही. म्हणुनच भुंगेरे अवस्थेत बंदोबस्त करणे फायदेशीर ठरू शकते.

काय कराल?
पूर्वमौसमी पाऊस झाल्यावर हुमणी किडीचे भुंगेरे सूर्यास्तानंतर मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात व बाभूळ, कडूलिंब, बोर झाडांवर मिलनासाठी जमा होतात.
अश्या झाडांच्या फांद्या रात्री लांब काठीच्या किंवा बांबूच्या मदतीने हलवून खाली पडलेले भुंगेरे वेचून नष्ट करावे.
भुंगेरे मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी सोलार चलित प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. कडू निंब किंवा बाभूळ झाडांच्या जवळ सापळे प्रस्तापीत करावे. भुंगेरे वेचून नष्ट करावे. शेतकऱ्यांनी हे उपाय सामूहिकरीत्या केल्यास जास्त फायदा होतो.

07/07/2026

FarmPrecise' ॲपसह करा तुमच्या पिकांचे योग्य नियोजन. तज्ज्ञांचा सल्ला आणि अचूक माहिती, आता फक्त एका क्लिकवर!

आजच ॲप डाऊनलोड करा. "फार्म प्रिसाईज अँप डाउनलोड करण्यासाठी इथे https://wotr.page.link/xrrfjPjG7H4m4xgm9 क्लिक करा"

26/06/2026

"A little information can make a big difference!"
Raosaheb Rajale, a farmer from Khadki Village, Jalna, shares how the FarmPrecise app saved his hard-earned harvest. Last year, unpredictable weather threatened his crops, but a timely 4-day advance weather alert allowed him to harvest just before the rains hit.
Technology is empowering our farmers to build resilience against climate change. Watch his story.

Address

The Forum, 2nd Floor Padmavati Corner, Above Ranka Jewelers, Pune
Maharashtra
411009

Alerts

Be the first to know and let us send you an email when FarmPrecise posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share