Navnath More Group

Navnath More Group शासकीय, निमशासकीय नोकरभरती जाहिराती, ?

फक्त आणि फक्त आपल्या मराठमोळ्या लोकांसाठी शासकीय, निमशासकीय नोकरभरती जाहिराती, स्पर्धा परीक्षा सामान्यज्ञान याविषयी मार्गदर्शन
For Regular Job Updates Like "Navnath More Group"
Click Below Link To Like
https://www.facebook.com/pages/Navnath-More-Group/302758253139205

*गुंतवणूक करताना नेहमी Prepare रहा पण Predict करू नका.*सगळी फायनॅन्स इंडस्ट्री भविष्यात काय होणार याचा अंदाज घेण्याचा सत...
10/06/2023

*गुंतवणूक करताना नेहमी Prepare रहा पण Predict करू नका.*

सगळी फायनॅन्स इंडस्ट्री भविष्यात काय होणार याचा अंदाज घेण्याचा सतत प्रयत्न करत असते. न्यूज चॅनेल्सवर दिवसभर आपल एकच, आज मार्केट पडणार, हे होणार आणि ते होणार.
फायनॅनशियल अँनालीस्ट्स आकडेवारीवर लक्ष केंद्रित करतात, मार्केट कोणत्या दिशेने जात आहे हे दर्शविणारे ट्रेंड शोधतात.
ट्रेडर गँग एखाद्या स्टॉकमध्ये किती प्रॉफिट मिळेल याच्या अंदाजानुसार स्टॉकची खरेदी आणि विक्री करत असतात.
पण सत्य हेच आहे की कोणी मार्केटला Predict नाही करू शकत. शेअर मार्केट अतिशय गुंतागुंतीच आणि अनपेक्षित आहे. इथे कधी काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही.
*मग अशा परिस्थितित तुम्ही काय केल पाहिजे*
अगदी सोप आहे, गुंतवणूक करताना Prepare रहा पण काही Predict करू नका.
मार्केट काय करेल याचा अंदाज घेण्याऐवजी, एक मजबूत इनवेस्टमेंट पोर्टफोलिओ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करा. याचा अर्थ स्टॉक्स, काही म्यूचुअल फंड्स आणि थोड गोल्ड, FD इ. सारख्या विविध Assets मध्ये गुंतवणूक करा.
अस केल्याने पोर्टफोलिओमध्ये विविधता येते आणि सोबत रिस्कपण कमी होते. कारण सगळे पैसे तुम्ही एकाच प्रकारच्या Asset मध्ये इनवेस्ट नाही केलेत.
याचा अजून एक फायदा असा की जेव्हा एक Asset बेकार काम करत, त्यामध्ये लॉस होत असेल तर इतर Assets तो लॉस भरून काढू शकतात.
आणि हो, आपल्या संगळ्याना हे चांगलच माहीत आहे की रिस्कला १००% कमी करता नाही येत पण अनपेक्षित (unexpected) गोष्टींची तयारी करून आपण आपल्या यशाची शक्यता वाढवू शकतो.
*आता ही तयारी नक्की कशी करायची? यासाठी खालील काही टिप्स कामी येतील*:
*आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा (Set financial goals*
तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून काय साध्य करायचे आहे? रिटायरमेंटसाठी बचत करायची आहे का? घर विकत घ्यायच आहे का? कॉलेज फीसाठी पैसे जमा करायचे आहेत का? एकदा तुम्हाला तुमच ध्येय माहित झाल्यानंतर, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्लॅनिंग करण्यास तुम्ही सुरवात करू शकता.
*लवकर सेविंग करायला सुरू करा (Start saving early)*
तुम्ही जितक्या लवकर Saving करण्यास सुरवात कराल तितका तुमचा पैसा वाढेल. जरी तुम्ही दर महिन्याला फक्त थोडी रक्कम वाचवू शकता तरीही चालेल.( काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेल नेहमीच चांगल)
*लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करा (Invest for the long term)*
हे काय सांगायला नको. शेअर मार्केट शॉर्ट टर्ममध्ये अस्थिर असला, तरी लॉन्ग टर्ममध्ये नेहमी वरच्या दिशेने वळला आहे. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये होणाऱ्या चढ-उतारांना घाबरू नका आणि उगाचंच टेंशन घेऊ नका.
*पोर्टफोलिओ नियमितपणे संतुलित करा (Rebalance your portfolio regularly)*
जसजशी तुमची गुंतवणूक वाढत जाईल तसतसे तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ पुन्हा संतुलित करणे आवश्यक आहे जेणेकरून त्याची रिस्क तुमच्या कंट्रोलमध्ये राहील. (Rebalance करणे म्हणजे काय? फॉर एक्झॅम्पल:- जस तुमच वय वाढत जाणार तुम्ही Risky Asset मधून पैसे काढून कमी रिस्क असलेल्या Asset मध्ये पैसे इनवेस्ट करणे.)

*म्युचुअल फंड / SIP बाबत मोफत माहितीसाठी आजच आपला व्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा.*
👇👇👇

https://chat.whatsapp.com/KJIfduv2Ao1EmXzi8FYgDJ

SIP आणि म्युचुअल फंडाच्या अधिक माहितीसाठी व योग्य मार्गदर्शनासाठी संपर्क करा.

*नवनाथ मोरे 9921359661*
(अधिकृत म्युचुअल फंड सल्लागार ARN नं - 265743)
पुणे

WhatsApp Group Invite

One of the best opportunity....make career in Indian Navy
01/07/2017

One of the best opportunity....make career in Indian Navy

06/12/2016

नमस्कार मित्रानो
शासकीय, निमशासकीय नोकरभरती जाहिराती, स्पर्धा परीक्षा सामान्यज्ञान याविषयी मार्गदर्शन यासाठी टेलीग्राम वर एक नवीन च्यनल सुरु करीत आहे.त्यात सहभागी व्ह्यायचे असल्यास channel join करा. ”नोकरी मार्गदर्शन”
https://telegram.me/joinchat/ENxox0EaeRGEFAPw4GEX2Q

17/11/2016

32 वर्षांनंतर राज्यभरात तलाठी पदासाठी मोठी भरती

मुंबई : गावपातळीवर महसूल विभागाचं काम अधिक चोखपणे व्हावं, यासाठी राज्याच्या महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1984 सालानंतर पहिल्यांदाच तलाठी पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. राज्यभरात एकूण 3 हजार 84 नव्या तलाठ्यांची भरती करण्याचा निर्णय राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे.

महसूलमंत्र्यांच्या या निर्णयामुळे यापुढे 6 गावांना एक तलाठी मिळेल. त्यामुळे गावांमधील लोकांना कामासाठी सहजरित्या तलाठी उपलब्ध होण्यास मदत होईल. शिवाय, तलाठ्यांवरील कामाचा ताणही कमी होईल.

राज्यात सध्या एकूण 12 हजार 327 तलाठी सज्जे आहेत. त्यात वाढ केल्यानंतर 15 हजार 411 तलाठी सज्जे होतील. आगामी मंत्रिमंडळ समितीत याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार आहे.

विभागीय संख्या किती असावी, याचा आराखडा उपसमितीने तयार केला आहे. जिल्हा स्तरावर किती सज्जे असावेत याची संख्या विभागीय आयुक्त ठरवतील. त्यानंतर तालुका स्तरावर किती सज्जे असावेत याची संख्या तहसिलदार ठरवतील.

1984 सालानंतर पहिल्यांदाच सालानंतर सज्जे संख्या वाढवली जात आहे. 2017 च्या सप्टेंबरमध्ये 3 हजार 84 तलाठी पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

विभागनुसार तलाठी भरती :

कोकणात सध्या 1 हजार 391 तलाठी असून, त्यात 744 ची वाढ करुन 2 हजार 135 करणार

नाशिक विभागात सध्या 2 हजार 63 तलाठी असून, त्यात 689 ची वाढ करुन 2 हजार 753 करणार

पुणे विभागात सध्या 2 हजार 496 तलाठी असून, त्यात 463 ची वाढ करुन 2 हजार 958 करणार

औरंगाबाद विभागात सध्या 2 हजार 474 तलाठी असून, त्यात 685 ची वाढ करुन 3 हजार 162 करणार

नागपूर विभागात सध्या 1 हजार 634 तलाठी असून, त्यात 478 ची वाढ करुन 2 हजार 112 करणार

अमरावती विभागात सध्या 2 हजार 267 तलाठी असून, त्यात 25 ची वाढ करुन 2 हजार 292 करणार

Source: ABP majha news

16/11/2016

आयबीपीएस विशेषज्ञ अधिकारी भरती (४१२२ जागा)
इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अंतर्गत आय.टी. ऑफिसर (स्केल – I) (३३५ जागा), ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल–I) (2580 जागा), राजभाषा अधिकारी (स्केल–I) (६५ जागा), लॉ ऑफिसर (स्केल–I) (११५ जागा), एचआर/पर्सनल ऑफिसर (स्केल–I) (८१ जागा), मार्केटींग ऑफिसर (स्केल–I) (९४६ जागा) अशा एकूण ४१२२ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २ डिसेंबर २०१६ आहे. अधिक माहिती http://www.ibps.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई मध्ये विविध पदांच्या ९ जागा
भारतीय प्रोद्योगिकी संस्थान, मुंबई येथे सहायक सुरक्षा निरीक्षक (महिला) (२ जागा), हार्डवेअर सहायक (१ जागा), डेंटल आयजिनिस्ट (२ जागा), इन्स्ट्रुमेंट ऑपरेटर (४ जागा) अशा एकूण ९ जागा कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ डिसेंबर २०१६ आहे. अधिक माहिती http://www.iitb.ac.in/encareers/staff-recruitment या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या १०३९ जागा
बँक ऑफ बडोदामध्ये क्रेडीट ॲनॅलिस्ट (चार्टर्ड अकाऊंटंट्स) (४० जागा), फायनान्स / क्रेडीट (४४० जागा), ट्रेड फायनान्स (१०० जागा), ट्रेझरी – प्रोडक्ट सेल्स (२० जागा), ट्रेझरी-डिलर्स/ट्रेडर्स ((५ जागा), ट्रेझरी रिलेशनशिप मॅनेजर्स (फारेक्स/डेरीव्हेटीव्हस) (३ जागा), ट्रेझरी-इक्वटी ॲनेलिस्ट (१ जागा), रिस्क मॅनेजमेंट (१० जागा), अग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट - गोल्ड लोन (१ जागा), ॲग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट-वेअरहाऊस रिसीप्ट (१ जागा), ॲग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – फुड अँड ॲग्रो प्रोसेसिंग (१ जागा), ॲग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – हाय टेक ॲग्री प्रोजेक्टस (१ जागा), ॲग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – फार्म मॅकेनायझेशन (१ जागा), मार्केटींग (२०० जागा), प्लॅनींग (६८ जागा), इकोनॉमिस्टस (५ जागा), लॉ (१७ जागा), आयटी – सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट (५ जागा), आयटी – डाटा सायंटीस्ट (२ जागा), आयटी – सॉफ्टवेअर टेस्टींग (१ जागा), आयटी – डाटाबेस मॅनेजमेंट (२ जागा), आयटी – डाटा ॲनॅलिस्ट (९ जागा), आयटी सिक्युरिटी (सीआयएसए) (३ जागा), एचआरएम (४० जागा), सिक्युरिटी (३२ जागा), फायर (९ जागा), ईलेक्ट्रिकल इंजिनिअर्स (२ जागा), सिवील इंजिनिअर्स / आर्किटेक्टस (८ जागा), ऑफिशिअल लँग्वेज (हिंदी)(१२ जागा) अशा एकूण १०३९ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ नोव्हेंबर २०१६ आहे. अधिक माहिती http://www.bankofbaroda.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक प्राध्यापक – सामाजिक दंतशास्त्र पदाच्या ५ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक प्राध्यापक – सामाजिक दंतशास्त्र (५ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ नोव्हेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य मराठी विकास संस्थेमध्ये विविध पदांच्या ३ जागा
राज्य मराठी विकास संस्थेमध्ये प्रकल्प व्यवस्थापक (१ जागा), तंत्रज्ञ (१ जागा), डेटाएंट्री ऑपरेटर (१ जागा) अशी एकूण ३ पदे मानधन तत्त्वावर ६ महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०१६ आहे. अधिक माहिती https://rmvs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई मध्य रेल्वे भरती २०१६
मुंबई मध्य रल्वे भरती २०१६ अंतर्गत शिकाऊ उमेदवारांकरीता विविध पदांच्या २३२६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.rrccr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय रिझर्व बँकेत सहायक पदाच्या ६१० जागा
भारतीय रिझर्व बँकेत सहायक (६१० जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांच्या १०९ जागा
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई येथील आस्थापनेत संशोधन सहायक (१२), सांख्यिकी सहायक(४३), अन्वेषक (४२), लिपीक टंकलेखक (०९) अशा एकूण १०९ पदांची भरती करण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख ०७ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०१६ अशी आहे. अधिक माहितीसाठी http://mahades.maharashtra.gov.in, http://www.maharojgar.gov.in, किंवा http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

विक्रीकर विभागात विक्रीकर निरीक्षकाच्या १८१ जागा
महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात विक्रीकर निरीक्षक-गट-ब (अराजपत्रित) संवर्गातील १८१ पदांची भरती करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पूर्व परीक्षा रविवार, दि. २९ जानेवारी २०१७ रोजी होणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०१६ अशी आहे. अधिक माहितीसाठी https://mahampsc.mahaonline.gov.in किंवा www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

भारतीय स्टेट बॅंकेत वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विभागीय प्रमुख पदाची भरती
भारतीय स्टेट बँकेमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विभागीय प्रमुख (विणन) – कॉर्पोरेट बँकिंग पदाकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज अर्ज करण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.sbi.co.in/careers या संकेतस्थळावर सीनियर वाइस प्रेसिडेंट ॲण्ड झोनल हेड (मार्केटिंग) – कॉर्पोरेट बँकिंगची भरती अंतर्गत उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये जनरल सर्जन पदाची भरती
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रममध्ये जनरल सर्जन (अर्ध-वेळ विशेषज्ञ) (१ पद) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध (२७ ऑक्टोबर) झाल्यापासून १५ दिवस आहे. अधिक माहिती www.bestundertaking.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मुख्य व्यवस्थापक पदाच्या जागा
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मुख्य व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक / व्यवस्थापक ही कंत्राटी स्वरुपातील पदे भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.mumbaiport.gov.in (media/vacancy) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नि:समर्थ (दिव्यांग) उमेदवारांसाठी विशेष भरती मोहीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेत नि:समर्थ (दिव्यांग) उमेदवारांसाठी विशेष भरती मोहिमेअंतर्गत ‘कामगार/कक्ष परिचर/हमाल/आया’ या संवर्गातील ५७० पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विहीत नमुन्यातील वैयक्तिक माहितीपत्रासह उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे दि. ८ ते १० नोव्हेंबर २०१६ या कालावधीत भरतीसाठी उपस्थित रहावे. अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर तसेच दै.लोकसत्ताच्या दि. २१ ऑक्टोबर २०१६ च्या अंकात उपलब्ध आहे.

The Institute of Banking Personnel Selection (IBPS) is an autonomous body set up to evolve and implement world class processes of assessment and selection of personnel for various client organizations. The foundation of the Institute is based on the philosophy of Speed, Accuracy and Confidentiality…

05/11/2016

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांनसाठी मी एक whatsaap group बनवला आहे त्यात सहभागी व्ह्यायचे असल्यास mobile number comment करा.
1.हां ग्रुप फ़क्त सीरियस स्टडी साठी बनवला गेला आहे
2.ग्रुप मद्दे कोणीही वात्रट msg अथवा शुभ रात्र शुभ सकाळ कोणत्याही शुभेच्छा टाकल्यास तात्काळ ग्रुप मधून रिमूव करण्यात येईल
3. ग्रुप वर 3 ते 4 दिवसाच्या आड़ किमान 2 ते 3 महत्वपूर्ण मुद्दे कोणत्याही विषयाचे(फ़क्त MPSC संदर्भात) टाकावे जी माहिती अत्यन्त महत्वपूर्ण वाटत असेल तीच टाकावी वायफळ माहिती टाकू नये
4. ग्रुप वर चर्चा करू नये.
5. रोजगार संदर्भात माहिती पण उपलब्ध करुण दिली जाईल.

My whats app Mob no post on group early as possibal .

03/08/2016

लिपिक आणी तलाठी भरती बाबत... :)
#नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
आस्थापनेवर 'लिपिक' पदांच्या ७ जागा
(Y)
#नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
आस्थापनेवर 'तलाठी' पदांच्या ११ जागा
(Y)
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांचे
अधिनस्त विविध उपविभागीय अधिकारी
कार्यालयांच्या आस्थापनेवरील तलाठी ५०
जागा, लिपिक-टंकलेखक ११ जागा, कनिष्ठ
लिपिक ४ जागा आणि वाहन चालक १ जागा
(Y)
#सिँधुदूर्ग जिल्हाची भरती पण सुटलेली आहे.

(y) उर्वरित जिल्हाच्या जागा लवकरच येतील.
आधिक माहीतीसाठी @प्रत्येक दिवशी आप आपल्या जिल्हाची वेबसाईट पहा.

Its:

23/06/2016

मुंबई : सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. लिपिक, टंकलेखक, तलाठी या पदांसाठी मोठी भरती होणार असून, त्यासाठीच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे.
किती पदांसाठी भरती?
लिपिक-टंकलेखकच्या 521 रिक्त पदांसाठी भरती आहे, तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी भरती आहे. महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत आयोजित बैठकीत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी याबाबत माहिती दिली.
परीक्षा कधी?
लिपिक-टंकलेखकच्या 521 रिक्त पदांसाठी रविवार 4 सप्टेंबर रोजी, तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी रविवार 11 सप्टेंबर 2016 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.
महसूल विभागातील कामांमध्ये गती येणार- राठोड
तलाठी, लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे भरल्यास महसूल विभागातील कामांमध्ये आणखी गती येण्यास मदत होईल,असेही राठोड म्हणाले.
भविष्यात आणखी भरती
सज्जा पुनर्रचना समितीच्या शिफारशी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असून, यामुळे नवीन तलाठी सज्जांची निर्मिती व मंडळ अधिकारी कार्यालये निर्माण होणार असल्याने भविष्यात देखील तलाठी, लिपिक-टंकलेखक संवर्गातील अनेक पदे निर्माण होतील व ही पदे देखील पारदर्शक पद्धतीने भरण्यात येतील, असेही राठोड यांनी सांगितले.

04/05/2016

🙏एमपीएससी म्हणजे काय?🙏🙏
👍एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सíव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
✍ लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते-
✍ - राज्यसेवा परीक्षा
✍ - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
✍- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
✍ - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
✍- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
✍- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
✍ - साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
✍ - पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
✍- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
✍- साहाय्यक परीक्षा
✍- लिपिक-टंकलेखक परीक्षा

👍राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते-

✍- उपजिल्हाधिकारी (गट अ)
✍ - पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट अ)
✍- साहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट अ)
✍- उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ)
✍- उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (गट अ)
✍ - महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ)
✍- मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ
✍- अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट अ)
✍- तहसीलदार (गट अ)
✍- साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (गट ब)
✍- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट ब)
✍- कक्ष अधिकारी (गट ब)
- गटविकास अधिकारी (गट ब)
✍- मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद, (गट ब)
✍- साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब)
✍- उपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट ब)
✍- साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट ब)
✍- नायब तहसीलदार (गट ब)

👍महसूल सेवा

👍उपजिल्हाधिकारी

हे राज्य सेवेतील सर्वोच्च पद आहे. बढती आणि सरळ सेवा प्रवेशाने या पदावर नेमणूक होते आणि १० ते १५ वर्षांच्या सेवेनंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये बढतीद्वारे प्रवेश मिळू शकतो.
नेमणुका - उपविभागीय अधिकारी, विविध खात्यांचे उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी. कामाचे स्वरूप
पुढीलप्रमाणे आहे-
✍- उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना उपविभागातील शांतता व सुव्यवस्था पाहणे, महसूल वसुली, निर्वाचन अधिकारी म्हणून कार्य इत्यादी.
✍- विविध खात्यांचा उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्या त्या खात्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण करणे व माहिती अद्ययावत ठेवणे.
✍- निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ व कनिष्ठ कार्यालयात समन्वय साधणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात सुसूत्रता ठेवणे.

🏇तहसीलदार🏇

✍या पदावर निवड राज्यसेवा परीक्षा (एमपीएससी)द्वारे केली जाते. राज्य सरकार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते. तहसीलदारांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे -
✍- तालुक्यातील महसूल वसुली, प्रशासन याबाबतची सर्व कामे तहसीलदार पार पाडतात. महसूल वसुलीबाबत अर्धन्यायिक अधिकार तहसीलदाराला दिलेले आहेत.
✍- तालुका दंडाधिकारी या नात्याने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे न्यायिक अधिकार तहसीलदाराला आहेत.
✍- आपत्ती व्यवस्थापन, नुकसानभरपाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी, भूमी अभिलेखाबाबतचे निर्णय इ. जबाबदाऱ्याही तहसीलदार पार पाडत असतात.

🏇 नायब तहसीलदार 🏇

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. तहसीलदारास करावी लागणारी कामेच नायब तहसीलदारांना पार पाडावी लागतात. कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- तहसीलदार पातळीवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नायब तहसीलदार करतात.
- महसूल अधिकारी म्हणून महसूल वसुली, बिगरशेती परवाने देणे इ.बरोबर जातीचे, रहिवासाचे दाखले देणे ही काय्रे नायब तहसीलदाराला पार पाडावी लागतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिकारी म्हणून काही न्यायिक अधिकार नायब तहसीलदाराला देण्यात आले आहेत.
- महसुली कामकाजांतर्गत अर्धन्यायिक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार काम पाहतात.

✍महाराष्ट्र पोलीस सेवा🏇

राज्यसेवेतील निवडीचे सर्वोच्च पद पोलीस उपअधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी आहे. उपअधीक्षकांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- गंभीर स्वरूपाच्या अपराधांचा तपास करणे.
- अधीनस्थ पोलीस कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व त्यांच्या तालमी इ.ची जबाबदारी डीवायएसपीवर असते. यासाठी ते वर्षांतून एकदा सर्व पोलीस ठाणी व चौक्यांची तपासणी करतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच काही बाबतीत परवाने देण्याचे अधिकार डीवायएसपीला असतात.

✍ महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा

शासनाचे विविध विभाग, महामंडळे येथील लेखाविषयक व वित्तीय जबाबदारीचे काम करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी उपलब्ध करून देता यावेत या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर १९६५ मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना करण्यात आली. १९६२ साली स्थापन करण्यात आलेल्या लेखा व कोषागार संचालनालयाचे संचालक लेखा विभागाचे प्रमुख असतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची या पदावर नेमणूक करण्यात येते.
राज्यसेवा परीक्षेतून वित्त व लेखा सेवा गट अ व ब या पदांसाठी निवड होते व या उमेदवारांची नेमणूक अनुक्रमे कोषागार अधिकारी/ साहाय्यक संचालक व अतिरिक्त कोषागार अधिकारी/ उपमुख्य लेखाधिकारी या पदांवर करण्यात येते. वित्त व लेखा सेवा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
- या सेवेतील अधिकाऱ्यांना शासनाच्या विविध विभागांमध्ये लेखाविषयक व लेखा परीक्षणविषयक बाबी सांभाळण्यासाठी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते.
- शासकीय रकमांचे वित्तीय विनियोजन करणे व याबाबत गरप्रकार होऊ न देणे ही या सेवेतील अधिकाऱ्यांची जबाबदारी असते.
- कार्यालयातील/विभागातील वित्तीय व्यवस्थापन तसेच वेतन भत्ते, रजा व आस्थापनाविषयक कामे या अधिकाऱ्यांना हाताळावी लागतात.

✍विक्रीकर (व्हॅट) विभाग

विक्रीकर (व्हॅट) हा राज्य शासनाच्या महसुलातील सर्वात जास्त वाटा असणारा कर म्हणून आहे. विक्रीकर विभाग हा अर्थमंत्रालयाच्या अधीनस्थ कार्यरत आहे. मुंबई विक्रीकर कायद्यान्वये विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य हे खात्यातील सर्वोच्च पद आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदासाठी वेगळी परीक्षा आयोजित करून साहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड करण्यात येते.
साहाय्यक विक्रीकर आयुक्ताच्या जबाबदाऱ्या- व्यापाऱ्यांची नोंदणी करणे, नोंदणीकृत व्यापाऱ्यांना सल्ला, मार्गदर्शन करणे, कराची वसुली इ. बाबींची निर्धारणा शाखेसंबंधीची कामे.
विक्रीकर निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या- प्रत्यक्ष करवसुली व त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी विक्रीकर निरीक्षकाची असते. नोटीस व समन्स बजावणे व याबाबतची कार्यवाही तसेच डीफॉल्टर्सचा पाठपुरावा करणे या बाबीही विक्रीकर निरीक्षकाच्या कार्यकक्षेत येतात.

✍मोटार वाहन विभाग

हा विभाग गृहमंत्रालयाच्या अधीन असतो. राज्यसेवा परीक्षेतून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब या पदासाठी निवड करण्यात येते. साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
शिकाऊ व पक्के ड्रायिव्हग लायसेन्स तसेच आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून दिला जातो. वाहनांची नोंदणी, हस्तांतरण तसेच दुसऱ्या राज्यात/प्रदेशात गेल्यास त्याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' देणे या बाबी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येतात. परवाने व नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण व दुय्यम प्रती देण्याबाबतची कार्यवाही साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून होते.

✍राज्य उत्पादन शुल्क विभाग

उत्पादन शुल्क हा राज्यसूचीतील विषय असून राज्य महसुलामध्ये याचा मोठा वाटा असतो.
राज्यसेवा परीक्षेद्वारे उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदावर नियुक्तीसाठी निवड करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्य़ासाठी एक राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक राज्य शासनाकडून नेमण्यात येतात.

राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक-

या पदाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
मद्यार्क व अमली पदार्थाची तस्करी रोखणे व त्यासाठी वेगवेगळ्या उद्योग, व्यवसायांची तपासणी करणे हे या विभागातील अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे काम आहे. मद्य, मद्यार्क, अमली पदार्थ, औषधी द्रव्ये इ. बाबतच्या महसुलाची वसुली हे अधिकारी करतात. अमली पदार्थविषयक गुन्ह्य़ांचा तपास करण्याची जबाबदारीसुद्धा या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
आयोगाकडून साहाय्यक व लिपिक संवर्गासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात. राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून कक्ष अधिकारी पदावर निवड होते.

👤कक्ष अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप👤

कार्यासनात येणारे टपाल व धारिकांवर विहित वेळेत कार्यवाही पूर्ण करण्याgची जबाबदाddरी कक्ष अधिकाऱ्यांवर असते. प्रत्यक्षात ही कार्यवाही साहाय्यकांकडून सुरू होत असली तरी याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार कक्ष अधिकाऱ्याला असतात.🙏🙏🙏🙏🙏🙏
from Kishor Surase Patil WMO टीचर ग्रुप

29/04/2016

शिकलेल्या पोरांमध्ये सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती असते ती वीस ते पंचवीस वर्षाच्या पोरांची.
ह्या वयात पोरांची डिग्री पूर्ण झालेली असते पण अजुन नोकरी मिळालेली नसते. फक्त घरी बसता येत नाय म्हणून बिचारे पोस्ट ग्रेजुएशन किंवा तसलेच काही शिक्षण चालू ठेवतात. आता तर इंजीनियरिंग वाली पोरंपण दूसरीकडे नोकरी नाय म्हणून MPSC किंवा UPSC कडे जास्त वळायला लागलेत.
आजकाल वर्गात कायम टॉपर राहणारी चश्मिश पोरंपण ज्यांनी अभ्यास सोडून दूसरे काहीच केले नाही ती पोरंपण Army आणि Police च्या भरती मध्ये पळताना दिसतात. ज्यांची B.Sc, M.Sc झालेय ते दहावी-बारावीच्या पोरांला ट्यूशन शिकवतात. त्यांच्यापेक्षा जास्त हाल इंजीनियरिंग झालेल्या पोरांचे होतात. बापानी घरी पार ओढताण करुन,तेवढी कमाई पण नसताना लाखो खर्च करुन पोराची इंजीनियरिंग पूर्ण केलेली असते आणि हे कंपनीवाले काष्टीच्या बाजारात शेळ्या विकल्याप्रमाणे आठ-दहा हजार द्यायलापण नाक मुरडतात.
ह्या वयात जेवढि मनाची घालमेल होत असेलना तेवढी कधीच होत नाय. शिक्षण पूर्ण करून नोकरी नाय. घरी बापाला पैशे सुद्धा मागायची लाज वाटते. हे कमी म्हणून गावातले अडानी त्याला विचारणार,"व्हंय रं अजुन किती राह्यलेय तुझं शिक्षण?तुला नोकरी कधी लागणार?आयला तू तर साहेब व्हणार ब्वा." किती डोकं फिरत असेल अशे टोमणे मारल्यावर?आणि त्याच्यातुन जर असा दुष्काळ पडला तर विचारुच नका.
दहावी-बारावी बळचं काठावर पास झालेला एखादा आर्मीत भरती झालेला कुणी सुट्टीला आल्यावर त्याला ही पोरं म्हणतात,"मजा आहे ब्वा तुमची"काळीज तुटंत ही अगतिकता बघुन. शिकलेल्या पोरींचे तरी बर आहे नोकरीचे नाय जमलं कुठ तरी निदान लग्न तरी लावता येतं पण शिकलेली पोरं काय करणार?
कुठंच काय नाय जमलं तर मोबाइल शॉपी काढ,कसले पॉलिसी एजेंट हो,MIDCमध्ये कामाला जा,एखांद्याच्या हाताखाली कामाला जा किंवा तसलेच काही सटर फटर उद्योग करावे लागत्यात ह्या सुशिक्षित पोरांना.'आई जेवु घालीना आणि बाप भिक मागु देईना' पार अशी अवस्था होते त्यांची.
मला वाटते मानसिक पाठबळाची सगळ्यात जास्त गरज ह्याच वयात असते. त्यांना पालकांनी नक्कीच समजुन घेतले पाहिजे. सगळं काही ठीक होईल असा विश्वास त्यांना दिला पाहिजे. बाकी पोरांनीपण सरकारला,मंदीला,दुष्काळाला शिव्या देण्यापेक्षा ह्यातून कसा उपाय निघेल हे बघितले पाहिजे. एक ध्यानात ठेवा सगळं ठीक होईल पण फक्त तुम्ही खचुन जावु नका.

26/04/2016

Hello all,
We JONHSON CONTROLS AUTOMATIVE LIMITED are scheduling a recruitment drive on April 30, 2016 at ISTC,icc devi gaurav complex, Pimpri

Position Title: Design Engineer / Product Engineer / Assistant Engg. Manager
Minimum Qualifications: B.E. / B. Tech. (Mechanical /Automobile)
Experience: 3 - 12 years

Job Specifications:
Catia V5 / UG

Experience in design & development areas of Seating Systems, sub systems and components (Complete Seats, Metals, Mechanisms, Plastics, Foams and ARHR)
Exposure to TcAE / VPM will be an added advantage
Good written and oral communication skills

If any one is intrested send resume on

[email protected]
Deep Gajjar

Address

Jai Maharashtra Chowk, Alandi Road, Opp. Mayur Provision Stores
Bhosari
411039

Telephone

8087600152

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navnath More Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Navnath More Group:

Share